मोठी बातमी ! STमध्ये मेगाभरती, तब्बल १७४५० पदं भरणार
मोठी बातमी ! STमध्ये मेगाभरती, तब्बल १७४५० पदं भरणार
img
दैनिक भ्रमर
नोकरीची वाट असणाऱ्या हजारो तरुणांसाठी आनंदाची  बातमी आहे कारण STमध्ये मेगाभरती होणार आहे. तब्बल १७४५० पदं भरली जाणार आहे. चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्ष कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. 

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ३०० व्या संचालक मंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार, बससेवा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक असलेले चालक व सहाय्यक मनुष्यबळ भाडेतत्त्वावर (कंत्राटी पद्धतीने) ३ वर्ष  कालावधीसाठी घेण्याकरिता ई-निविदा प्रक्रिया अवलंबण्यात येत आहे. अर्थात,  ही ई-निविदा प्रक्रिया सहा प्रादेशिक विभाग निहाय राबविण्यात येणार आहे. 

नाशिकच्या सिडको परिसरात मद्यधुंद तरुणींचा धिंगाणा; कॉलर पकडून एकाला चोपलं अन पुढे...

भविष्यात येणाऱ्या आठ हजार नवीन बसेससाठी मनुष्यबळाची अत्यंत आवश्यकता असल्याने कंत्राटी पद्धतीने 17,450 चालक व सहाय्यक पदासाठी भरती राबविण्यात येणार आहे. येत्या 2 ऑक्टोबरला त्याची निविदा प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून राज्यातील हजारो बेरोजगार तरुण -तरुणींना रोजगार उपलब्ध होणार असून 30 हजार रुपये इतके किमान वेतन त्यांना मिळणार आहे. 

तरुणाच्या हत्येचे उमटले पडसाद ; नंदुरबार जिल्ह्यात कडकडीत बंद

 प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मनुष्यबळ पुरविणाऱ्या संस्थांकडून राज्य परिवहन महामंडळाला आवश्यक मनुष्यबळ वेळेत उपलब्ध होईल. कंत्राटी पद्धतीने भरती होणाऱ्या चालक व सहाय्यक उमेदवाराला सुमारे ३०,०००/- वेतन देण्यात येणार आहे. याबरोबरच उमेदवारांना एसटीकडून प्रशिक्षण देखील दिले जाणार आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group