राज्य परिवहन महामंडळाला ४ दिवसांत पावणे २ कोटींचा फटका!
राज्य परिवहन महामंडळाला ४ दिवसांत पावणे २ कोटींचा फटका!
img
Dipali Ghadwaje
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरु असलेल्या आंदोलनाला मराठवाड्यातील अनेक भागात हिंसक वळण लागले आहे. मराठा समाजाच्या आंदोलनामुळे पुण्यातून मराठवाडा विदर्भ आणि सोलापूरला जाणाऱ्या ७५० फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

त्यामुळे मराठवाडा विदर्भ जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.  पुण्यातून एसटी बसच्या दररोज १ हजार ५५६ फेऱ्यांची नियोजन केले जाते. आंदोलनामुळे ७५० फेऱ्या रद्द करण्यात आल्यात. प्रामुख्याने बीड जिल्ह्यासह अमरावती,नागपूर,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागातील फेऱ्या देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

सोमवारपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणाऱ्या एसटी बसेस देखील बंदच आहेत. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मागील ४ दिवसांपासून नाशिकहून मराठवाड्याकडे जाणारी एसटी सेवा बंद आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, सिल्लोड, परभणी, पैठण यासह मराठवाड्यातील अन्य शहरात जाणारी एसटी सेवा बंद आहे.

आंदोलकांकडून एसटी बसेसना टार्गेट केलं जात असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून नाशिकहून मराठवाड्यात जाणाऱ्या एसटी बसेस अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्यात. मागील ४ दिवसांपासून बससेवा बंद असल्याने प्रवाशांना मात्र मनस्ताप सहन करावा लागतोय.
 
आकडेवारी
  • पुणे विभागातून सुटणाऱ्या फेऱ्या १५५६
  • आंदोलनामुळं रद्द झालेल्या फेऱ्या ७७०
  • पुणे विभागाचे आर्थिक नुकसान ४० लाख २७ हजार पेक्षा जास्त नुकसान
परभणी जिल्ह्यातही मराठा आरक्षणाची धग कायम आहे. चार दिवसांपासून परभणी, पाथरी, गंगाखेड, जिंतूर , हिंगोली, वसमत आणि कळमनुरी या सात आगारातून धावणारी बस सेवा पूर्णपणे बंद असल्याने परभणी विभागाला पावणे दोन कोटींचा फटका बसला आहे. लाल परीची सेवा बंद असल्याने खाजगी वाहन धारकांचे मात्र अच्छे दिन आले तर प्रवाशांच्या खिशाला मात्र मोठी कात्री बसली आहे.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group