खळबळजनक ! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसने अचानक घेतला पेट
खळबळजनक ! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या एसटी बसने अचानक घेतला पेट
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : तुळजापूर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. तुळजापूरहून निलेगावकडे निघालेल्या एसटी बसला तीर्थ बुद्रुक जवळ अचानक आग लागली. तुळजापूर नळदुर्ग रोडवर चालत्या एसटी बसने पेट घेतला. ही आग लागली त्यावेळी बसमध्ये बरीच गर्दी होती. आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, ड्रायव्हरच्या सतर्कतेनं मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

हे ही वाचा 
काँग्रेस आमदाराला ईडीने ठोकल्या बेड्या; सापडली १२ कोटींची कॅश अन्...

एसटीला आग लागल्याचं बघताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच एसटीतील प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. या घटनेची माहिती मिळताच महामंडळाचे अधिकारी आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एसटीला लागलेली आग विझवण्याचा प्रयत्न केला. तसेच प्रवाशांना एसटीतून सुखरूप बाहेर काढण्यात आले. आगीचे कारण अस्पष्ट असून, बसच्या केबिनमध्ये स्पार्किंग झाल्याने बसने पेट घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group