भयंकर : चार ट्रक आणि बसचा विचित्र अपघात ; नेमकं काय घडले? वाचा
भयंकर : चार ट्रक आणि बसचा विचित्र अपघात ; नेमकं काय घडले? वाचा
img
Dipali Ghadwaje
नंदुरबार : अपघाताची मोठी घटना समोर आली आहे.  नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटात चार ट्रकांचा आणि सुरत-अमळनेर बसचा भीषण अपघात झाल्याची घटना घडलीय. या अपघातात दोन चालक केबिनमध्ये अडकले आहे. अपघातात एक ठार तर 15 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार , 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9.30 वाजे दरम्यान नवापूर तालुक्यातील कोंडाईबारी घाटामध्ये हा विचित्र अपघात झाला आहे. चार ट्रक आणि एक बस अशा पाच वाहनांचा भीषण अपघात झाला आहे. दोन ट्रक चालक केबिनमध्ये अडकले असून गुजरात राज्यातील सुरत अमळनेर बस मधील आठ ते दहा प्रवासी जखमी झाले आहे. तसेच ट्रकमधील ही चालक जखमी झालेत. जखमींना उपचारासाठी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून दाखल करण्यात आले आहे.

घाटात चार ट्रकचा विचित्र अपघातामुळे वाहनांचे आणि मुद्देमालाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेतर ट्रक चालक सहचालक केबिन अडकले आहे.त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन केले जात आहे. गुजरात राज्यातील बस अपघातग्रस्त झाल्याने जखमी प्रवाश्यांना रूग्णालयात दाखल केले आहे.

अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पर्यायी रस्त्याने वाहतूक वळून वाहतूक सुरळीत सुरू केली आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group