पुलावर स्टेअरिंगच नियंत्रण सुटणार होतं, पण तितक्यात… ; नेमकं काय घडलं?
पुलावर स्टेअरिंगच नियंत्रण सुटणार होतं, पण तितक्यात… ; नेमकं काय घडलं?
img
Dipali Ghadwaje
जळगाव येथे ड्रायव्हर हा मद्यधुंद अवस्थेत एसटी बस चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चालक दारुच्या नशेत असल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांनी आरडाओरड करत बस थांबवल्याने मोठा अनर्थ टळला. जळगाव डेपोतून ही एसटी बस बाभूळगाव येथे मुक्कामी जात होती. त्यावेळी हा प्रकार घडला.

मिळालेल्या माहितीनुसार , जळगाव डेपोची ही बस बाभूळगावला चाललेली. रात्री त्याच गावात ही बस थांबणार होती. 16 डिसेंबरला प्रवास सुरु झाला. पाळधीचा पुल पार केल्यानंतर ड्रायव्हर मद्यधुंद असल्याच प्रवाशांच्या लक्षात आलं. बांभोरी पुलावर थोडक्यात अपघातात टळला. पुलावर बस चालकाच स्टेअरिंगवरील नियंत्रण पूर्णपणे जर सुटलं असतं, तर मोठी दुर्घटना घडली असती.

सुदैवाने अनर्थ टळला. बांभोरी पुलावर ड्रायव्हरचे स्टेअरिंगवरील नियंत्रण सुटत असल्याचे लक्षात येताच प्रवाशांनी आरडाओरडा करायला सुरुवात केली. थोड्याच अंतरावर बस थांबवायला चालकाला भाग पाडले.

सदर घटनेची माहिती मिळताच विभाग नियंत्रक भगवान जगनोर हे खासगी वाहनाने तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ते प्रवाशांशी बोलले. त्यांनी तिथे दुसऱ्या ड्रायव्हरची व्यवस्था करुन बस मार्गी लावली. मेडीकलमध्ये ड्रायव्हरने मद्यपान केल्याच निष्पन्न झाल्यानंतर त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group