दैनिक भ्रमर : एक मोठी बातमी समोर आली आहे. कर्नाटकमधील काँग्रेसचे आमदार केसी वीरेंद्र यांना ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आज बेड्या ठोकल्या. गंगटोकमध्ये बेकायदेशीर ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीत सहभागी असल्याच्या आरोपाखाली केसी वीरेंद्र यांना अटक करण्यात आली आहे. १२ कोटी रूपयांची रोख कॅश आणि ६ कोटी रूपयांच्या किंमतीचे सोने-चांदीचे दागिने आणि चार गाड्या ईडीने जप्त केल्या आहेत.
हे ही वाचा
अवैध ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजीच्या आरोपाखी शुक्रवारी ईडीने वीरेंद्र, त्यांचा भाऊ आणि अन् साथीदारांच्या विरोधात सहा राज्यात ३० ठिकाणी छापेमारी केली. ईडीने चित्रदुर्गमध्ये सहा, बंगळुरूमध्ये १०, जोधपूरमध्ये ३, मुंबईमध्ये दोन, गोव्यात आठ आणि हुबळीमध्ये एका ठिकाणी छापा मारला. त्यामध्ये पाच प्रमुख कसिनो, पपीज कसिनो गोल्ड, ओशन रिव्हर्स कसिनो प्राइड, ओशन ७ कसिनो, बिग डॅडी कसिनो यांचा समावेश आहे.
हे ही वाचा
सिक्कीमच्या दौऱ्यावर असलेल्या आमदार केसी वीरेंद्र यांना कोलकाता इथल्या 'ईडी'च्या पथकाने अटक करून बंगळूरला आणले आहे. आमदार केसी वीरेंद्र हे त्यांच्या सहकाऱ्यांसह, सिक्कीममधील गंगटोक येथे गेले होते. त्यांनी कॅसिनोसाठी जमीन भाड्याने घेतल्याचा आरोप आहे. काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र यांना सिक्किममधील कथित अवैध ऑनलाइन आणि ऑफलाइन सट्टेबाजी प्रकरणात अटक केली आहे.