मोठी बातमी! काँग्रेसची विधानसभेच्या
मोठी बातमी! काँग्रेसची विधानसभेच्या "इतक्या" जागा लढण्याची तयारी सुरु, नाना पटोलेंचं मोठं वक्तव्य
img
Dipali Ghadwaje

लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपलेली आहे. आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरु केल्याचं पाहायला मिळच आहे. पुढच्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीर राजकीय नेते वेगवेगळी वक्तव्य करत असताना दिसत आहे.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या एका वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.

काय म्हणाले नाना पटोले?

महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. ते भंडाऱ्यात बोलत होते.

महाराष्ट्रात आम्ही सगळीकडं विधानसभेची तयारी चालू केली असल्याचे नाना पटोले म्हणाले. मी साकोलीचा आमदार आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे, मला इथं यावं लागतं. इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. ते प्रश्न सोडवावे लागतात. पण, महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलं आहे.

दरम्यान नाना पटोलेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. कारण, लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजुट दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. 

 

इतर बातम्या
Join Whatsapp Group