काँग्रेस पक्षाला दिवसेंदिवस गळती लागण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यात आता पुन्हा एकदा भर पडते की काय असा प्रश्न उभा राहत आहे. काँग्रेसच्या बड्या नेत्यांमध्ये मतभेद वाढल्याचं सध्या दिसून येत आहे.
काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि काँग्रेसमधील मतभेद वाढले आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. मुरलीधरन यांनी थरुर यांना पक्षापासून वेगळे करण्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी नुकतेच म्हटले आहे की थरूर हे काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्यदेखील आहेत. ते आता आमच्या पक्षाचे आहेत असे मानले जाणार नाही. त्यांच्यावर कोणती कारवाई करायची? हे आता पक्षश्रेष्ठी ठरवतील.
जोपर्यंत थरूर राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यावर त्यांच्या भूमिकेत बदल करत नाहीत, तोपर्यंत त्यांना पक्षाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी बोलावले जाणार नाही. ते आता आमच्यासोबत नाहीत, असे समजा, असे मुरलीधरन म्हणाले.