काँग्रेसला पुन्हा धक्का;
काँग्रेसला पुन्हा धक्का; "या" नेत्याचा शिंदे गटात प्रवेश
img
दैनिक भ्रमर

मुंबई (भ्रमर वृत्तसेवा) :- काँग्रेस प्रवक्ते राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. 

राजू वाघमारे दीर्घकाळापासून काँग्रेसचे प्रवक्ते होते. माध्यमांमध्येही त्यांनी पक्षाची भूमिका अनेकदा जाहीरपणे मांडली होती. अशातच आता त्यांनी काँग्रेसची साथ सोडली असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची कास धरली आहे. 

राजू वाघमारे बोलताना म्हणाले की, काँग्रेस पक्षाची सध्या होत असलेली फरफट आणि पक्षातील काही नेत्यांच्या गलिच्छ राजकारणाला कंटाळून मी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस काम करते का? असा प्रश्न आहे. संजय निरुपम यांनी उत्तर पश्चिमची जागा मागितली. मात्र, त्यांच्यावर दबाव आणत पक्षाबाहेर काढले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना रक्त सांडत सांगावे लागत आहे की ही जागा आमची आहे.

भिंवडीची जागा थेट शरद पवारांनी जाहीर केली. याचा परिणाम माझ्या सारख्या कार्यकर्त्यांवर झाला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांना भविष्य कळत नाही काय आहे? त्यांना दिशा दाखवण्यासाठी आज मी पक्षप्रवेश करत आहे.

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित; वाचा कोणाला मिळाल्या किती जागा

मागील दोन वर्षांत मुख्यमंत्र्यांनी मोठी कामगिरी केली आहे. ते कॉमन मॅन सीएम आहेत. भारताच्या इतिहासात सर्वात जास्त काम करणाऱ्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव आहे. काँग्रेसमध्ये असताना शिंदे यांच्यासंदर्भात सर्व्हे असताना मी जाहीरपणे मान्य केले होते. ज्या मुख्यमंत्र्यांना सामान्य माणूस कधीही भेटू शकतो. जो 20-20 तास काम करतो, असा मुख्यमंत्री आवडणारा असणार असे मी चॅनलवर सांगितले होते. तेव्हा माझ्यावर टीका झाली. मात्र जे खरे आहे तेच मी बोलतो, असे राजू वाघमारे म्हणाले. 

मी माझे भाग्य समजतो की, मुख्यमंत्र्यांनी मला संधी दिली. छत्रपतींचे स्वप्न साकार करण्यासाठी मी शिंदेंसोबत आहे. काँग्रेस पक्ष, उबाठातील हजारो कार्यकर्ते आहेत, ज्यांना नेता नाही. हे सर्व एसीमधले नेते आहेत, शिंदे तळागाळातले नेते आहेत, असे सांगत राजू वाघमारे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांचे कौतुक केले.

इतर बातम्या
Join Whatsapp Group