काँग्रेस खासदाराच्या मुलाला नोकरीवरून काढलं, कारण काय ?
काँग्रेस खासदाराच्या मुलाला नोकरीवरून काढलं, कारण काय ?
img
वैष्णवी सांगळे
अमेरिकेतील किंबहुना जगातील अत्यंत प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या 'वॉशिंग्टन पोस्ट' या वृत्तपत्राने मोठ्या प्रमाणावर कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. या टाळेबंदीचा फटका एकूण कर्मचाऱ्यांपैकी तब्बल एक तृतीयांश कर्मचाऱ्यांना बसला आहे. विशेष म्हणजे, भारताचे माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांचे सुपुत्र इशान थरूर यांचीही सेवा या वृत्तपत्राने खंडित केली आहे. इशान हे गेल्या अनेक वर्षांपासून येथे परराष्ट्र धोरण विश्लेषक आणि स्तंभलेखक म्हणून कार्यरत होते.

सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल
इशान थरूर यांनी सोशल  मीडियावर पोस्ट लिहून आपली नोकरी गेल्याचे सांगितलं. त्यांनी हा दिवस न्यूजरूम आणि जागतिक पत्रकारितेसाठी एक वाईट दिवस असं म्हणत भावनिक पोस्ट लिहिली आहे.याचबरोबर त्यांनी न्यूजरूमचा एक फोटो शेअर करत त्याला एक वाईट दिवस असं कॅप्शन दिलं.

इशान एक्सवर लिहितात की, 'आज आंतरराष्ट्रीय स्टाफच्या अनेक साथीदारांसोबत आणि इतर काही चांगल्या कर्मचाऱ्यांसोबत मला देखील वॉशिंग्ट पोस्टने काढून टाकलं आहे. आज संपूर्ण न्यूजरूम आणि दर्जेदार पत्रकार ज्यांनी वॉशिंग्टन पोस्टची आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवा केली त्यांचे मन चांगलेच दुखावले गेले आहे.'

वाचकांना जग आणि त्यातील अमेरिकेचे स्थान चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत करण्यासाठी मी जानेवारी २०१७ मध्ये वर्ल्डव्ह्यू कॉलम सुरू केला आणि गेल्या काही वर्षांत आठवड्यातून अनेक वेळा कॉलम पाहणाऱ्या अर्धा दशलक्ष निष्ठावंत सदस्यांबद्दल मी आभारी आहे.

वॉशिंग्टन पोस्टच्या व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार, व्यवसायातील आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी आणि कंपनीला पुन्हा नफ्यात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही काळात वृत्तपत्राच्या डिजिटल सबस्क्रिप्शनमध्ये घट झाली असून जाहिरातींचे उत्पन्नही कमी झाले आहे. प्रसिद्ध उद्योगपती जेफ बेझोस यांच्या मालकीच्या या वृत्तपत्राला गेल्या आर्थिक वर्षात मोठ्या आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागला होता.
इतर बातम्या
Join Whatsapp Group