शिवसेना महिला आघाडीचे काँग्रेसच्या सुनील केदारांच्या विरोधात आंदोलन
शिवसेना महिला आघाडीचे काँग्रेसच्या सुनील केदारांच्या विरोधात आंदोलन
img
चंद्रशेखर गोसावी

नाशिक - काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांच्या विरोधामध्ये नाशिक शिंदे गटाच्या शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले.

राज्यतील महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेवर विरोधकांकडून सुरूवातीपासूनच टीका सुरू असून योजनेच्या संदर्भात काही ना काही अडथळे आणण्याचे प्रयत्न देखील वारंवार विरोधकांकडून केला जात आहेत. मात्र, महायुती सरकारने ही योजना यशस्वी करून दाखवली आहे. आता या
योजनेवर काँग्रेसचे सुनील केदार यांनी मोठं विधान केलं आहे. 

काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आम्ही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना बंद करू असं सुनील केदार यांनी म्हटलं आहे. केदार यांच्या या विधानाचा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने  निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना नाशिक महिला आघाडीच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, मायको सर्कल येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना नाशिक महिला आघाडी जिल्हाप्रमुख सुवर्णा मटाले, मंगला भास्कर, अस्मिता देशमाने,  मंदाकिनी जाधव, आशा पाटील, सुलोचना मोहिते, रोहिणी देवरे, मंजुषा पवार, सुनिता जाधव, भारती धात्रक, सुषमा शिरसाठ, अलका शिरसाठ, सरला चव्हाण, कल्पना सावंदे, पूनम भालेराव, उषा पाटील, शाहीन अन्सारी, गौरी सैंदाणे, मनजित कौर, वैष्णवी ठाकरे, हेमलता जगताप, प्रगती घोडके, संगीता पवार आदी महिला आघाडी पदाधिकारी उपस्थित होत्या.

सुनील केदार यांच्या विरोधात काँग्रेस लाडक्या बहिणींचा सावत्र भाऊ ! आमचे पैसे नका खाऊ !, सुनील केदारचे करायचे काय ! खाली डोकं वर पाय ! लाडक्या बाहिणींचा दुष्ट भाऊ ! केदार तुला आम्ही निवडणुकीत पाडू !, बँक घोटाळ्याचा आरोपी ! लाडक्या बहिणींची केदारला पोटदुखी ! मिळून साऱ्या बहिणी ! काँग्रेसला पाजू पाणी ! घोषणा देण्यात आल्या.

लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची यशस्वी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून जवळपास १ कोटी ५० लाख पेक्षा जास्त महिलांना आर्थिक मदत मिळत आहे. सर्वत्र महिलांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी भगिनींच्या घरी मुख्यमंत्री स्वतः भेट देत आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या पोटात दुखणं स्वाभाविक आहे.

काँग्रेस पक्षाला व त्यांच्या नेत्यांना आधीच अंतर्गत समस्यांचा सामना करावा लागत असून त्यातच लाडकी बहीण योजनेमुळे काँग्रेस पूर्णपणे हादरली असल्याचे जिल्हाप्रमुख सुवर्णा मटाले यांनी यावेळी सांगितले. 
इतर बातम्या
नाशिक जिल्ह्यात

Join Whatsapp Group