१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध कारवाई करा ; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी
१७ तक्रारी दाखल, पंतप्रधानांविरुद्ध कारवाई करा ; काॅंग्रेसची निवडणूक आयाेगाकडे मागणी
img
दैनिक भ्रमर
प्रचारसभांमध्ये निवडणूक जाहीरनाम्याचा हवाला देत केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ठोस, योग्य आणि स्पष्ट कारवाई करावी, अशी मागणी आज निवडणूक आयोगाकडे केली. मात्र, त्यावर कोणतेही भाष्य करण्यास निवडणूक आयोगाच्या प्रवक्त्याने नकार दिला. केंद्रात सत्तेत आल्यास काँग्रेस जनतेची संपत्ती मुस्लिमांमध्ये वाटून देईल.

आई-बहिणींची मंगळसूत्रेही सोडणार नाही, या पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचारसभांमध्ये केलेल्या विधानांमुळे काँग्रेसचे नेते क्षुब्ध झाले आहेत. मुद्यांवरुन लक्ष उडविण्याचे त्यांच्यापाशी नवनवे तंत्र आहेत, अशी मोदी यांच्या विधानांवर राहुल गांधी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक सिंघवी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस नेत्यांच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगात सतरा तक्रारी दाखल केल्या. तर, आयोगाने मोदी यांच्यावर आतापर्यंत कारवाई का केली नाही, असा सवाल ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी केला.

पद्म पुरस्कार वितरणाची घोषणा! वाचा संपूर्ण यादी

मनमोहनसिंग यांच्या वक्तव्याचा दिला दाखला

विशिष्ट अल्पसंख्याक समाजाचा देशातील साधनसंपत्तीवर पहिला हक्क आहे असे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह २००६ साली म्हणाले होते. त्याचा हवाला देऊन नरेंद्र मोदी राजस्थानातील सभेत म्हणाले होते की, जे घुसखोर आहेत, ज्यांना अधिक अपत्ये आहेत अशांना लोकांची संपत्ती वाटण्यासाठी काँग्रेस तयारी करत आहे. मात्र सोमवारी झालेल्या सभेत विशिष्ट समुदायाचा उल्लेख टाळून मोदी यांनी हाच आरोप पुन्हा केला. काँग्रेस आणि इंडिया आघाडीच्या हेतूंबद्दल जनतेने सावधानता बाळगावी असेही ते म्हणाले.

पंतप्रधानांचे काॅंग्रेस जाहीरनाम्याबाबत करणार प्रबोधन : खरगे

काँग्रेसच्या जाहीरनाम्याविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातीयवादाला खतपाणी घालणारी विधाने केल्याचा आरोप करून त्यांच्या विरोधात मोहीम सुरू करण्याचा निर्णय त्या पक्षाने घेतला आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी सांगितले की, काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेल्या आश्वासनांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रबोधन करण्यासाठी मी त्यांच्या भेटीची वेळ मागितली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group