पीएम मोदी यांचा 'श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारा'ने सन्मान
पीएम मोदी यांचा 'श्रीलंका मित्र विभूषण पुरस्कारा'ने सन्मान
img
Dipali Ghadwaje
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन दिवसांच्या श्रीलंका दौऱ्यावर आहेत. २०१९ नंतर पहिल्यांदात पीएम मोदी श्रीलंकेला गेले आहेत. श्रीलंकेने त्यांचे जोरदार स्वागत केले. श्रीलंकेच्या राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांनी पंतप्रधान मोदींना श्रीलंका मित्र विभूषणाया हा सर्वोच्च गैर-नागरी सन्मान प्रदान केला.

या सन्मानानंतर पंतप्रधान मोदी यांनी 'हा १४० कोटी भारतीयांसाठी सन्मान असल्याचे म्हटले आहे . पीएम मोदींनी श्रीलंकेचे राष्ट्रपती, सरकार आणि जनतेचे आभार मानले आहेत.

मित्र विभूषणय हा श्रीलंकेतील सर्वोच्च बिगर-नागरी सन्मान आहे. हा सन्मान परदेशी मान्यवरांना दिला जातो. श्रीलंकेशी मैत्रीपूर्ण संबंध असलेल्या राष्ट्रप्रमुखांना श्रीलंका सरकार हे पुरस्कार देते.

या पुरस्कारात रौप्य पदक आणि प्रशस्तिपत्र दिले जाते. हे पदक श्रीलंकेच्या नऊ रत्नांनी सजवले आहे. यात चंद्र, सूर्य, पृथ्वी आणि कमळाच्या पाकळ्या बनवलेल्या आहेत. 0

पदकावर "पुन कलसा" कोरलेले आहे. ते भाताने भरलेले भांडे असते. हे समृद्धी आणि नूतनीकरणाचे प्रतीक मानले जाते. पदकावरील सूर्य आणि चंद्र हे भारत आणि श्रीलंकेतील शाश्वत संबंधांचे प्रतिनिधित्व करतात. हा पुरस्कार २००८ मध्ये श्रीलंकेचे तत्कालीन राष्ट्रपती महिंदा राजपक्षे यांनी सुरू केला होता.   
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group