स्मृती ईराणी असं नाव आहे जे अभिनय विश्व आणि राजकारणात देखील प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. अनेक मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारल्यात स्मृती ईराणी यांनी चाहत्यांच्या मनावर आणि टीव्ही विश्वावर राज्य केलं.
अभिनय विश्वात स्वतःच्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर स्मृती ईराणी यांनी राजकारणाकडे आपला मोर्चा वळवला. आता स्मृती ईराणी राजकारणात सक्रिय आहे. दरम्यान नुकताच झालेल्या एका मुलाखतीत स्मृती ईराणी यांनी मोठा खुलासा केला आहे.
29 जून रोजी बरखा दत्त यांनी आयोजित केलेल्या ‘वी द वुमन 2015 च्या यूके आवृत्तीच्या उद्घाटन समारंभाला अभिनेत्री आणि राजकारणी स्मृती इराणी उपस्थित होत्या. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्वतःच्या व्यावसायिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले.
स्मृती ईराणी म्हणाल्या, ‘2014 मध्ये माझा पुन्हा एक करार झाला आणि मी त्यातून बाहेर पडली कारण मला कॅबिनेट मंत्री म्हणून भारतीय संसदेत सेवा करायची होती. तेव्हा माझ्याकडे दोन प्रोजेक्ट होते.
दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्यासोबत एका सिनेमा होता आणि ‘क्योंकि सास भी कभी बहू थी…’ पण मला दोन्ही प्रोजेक्टना नकार द्यावा लागला. कारण मंत्रीपदाची शपथ घेण्यासाठी मला पंधानमंत्री नरेंद्र मोदी कार्यालयातून फोन आलेला…’ असं देखील स्मृती ईराणी म्हणाल्या.
पुन्हा प्रदर्शित होतेय ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिका?
2000 च्या दशकात बरीच लोकप्रिय झालेली एकता कपूरची मालिका ‘क्यूंकी सास भी कभी बहू थी’ काही काळासाठी टेलिव्हिजन पडद्यावर परतणार आहे, ज्यामध्ये स्मृती इराणी आणि अमर उपाध्याय पुन्हा एकदा तुलसी आणि मिहिर यांच्या भूमिका साकारताना दिसणार आहेत.
स्मृती ईराणी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर, राजकारणात येण्यापूर्वी स्मृती ईराणी टीव्ही विश्वात सक्रिय होत्या. ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ मालिके शिवाय त्यांनी ‘एक थी नायका’, ‘तीन बहूरानियां’ यांसारख्या मालिकांमध्ये देखील काम केलं. आता स्मृती ईराणी राजकारणात मोठी भूमिका बजावत देशाची सेवा करत आहेत.