मोठी बातमी : दरवर्षी 25 जून 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळणा जाणार - केंद्र सरकार
मोठी बातमी : दरवर्षी 25 जून 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळणा जाणार - केंद्र सरकार
img
Dipali Ghadwaje
दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिवस' म्हणून पाळला जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्र सरकारने केली आहे. 

याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी यासंदर्भातील अधिसूचनेचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केले आहे.

अमित शाहंची पोस्ट काय?

संविधान हत्या दिवसाबाबत माहिती देताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी एक पोस्ट टाकली आहे. ज्यात त्यांनी म्हटले आहे की, 25 जून 1975 रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आपली हुकूमशाही मानसिकता दाखवत देशात आणीबाणी लादून भारतीय लोकशाहीच्या आत्म्याचा गळा घोटला होता. तसेच लाखो लोकांना विनाकारण तुरुंगात टाकले होते. माध्यमांचा आवाज दाबला गेला. या दिवसाचा आणि घटनेचा निषेध म्हणून आता भारत सरकारने दरवर्षी 25 जून हा दिवस 'संविधान हत्या दिन' म्हणून पाळला जाईल असा निर्णय घेतला आहे. हा दिवस 1975 च्या आणीबाणीच्या अमानुष वेदना सहन करणाऱ्या सर्वांच्या अतुलनीय योगदानाचे स्मरण करेल असे शाहंनी त्यांच्या पोस्टमध्ये म्हटले आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group