राज्यसभेत करतांना केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यावेळी अमित शाह यांनी आंबेडकरांचे नाव घेणे ही फॅशन झाली असल्याचे म्हटले. यावरून अमित शाह आणि भाजपवर टीकास्त्र सोडले जात आहे. दरम्यान, आज पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले.
दरम्यान, बाबासाहेबांवरील वक्तव्याने प्रकाश आंबेडकरांनीही भाजपवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. शाह यांच्या वक्तव्यातून भाजपचा जळफळाट बाहेर पडला असल्याची टीका प्रकाश आंबेडकरांनी केली.
प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले की, भाजप पक्ष आता जन्माला आलाय. त्या आधी जनसंघ होता. आर.एस.एस.होता. 1949, 1950, 1957, 1958 या दरम्यान डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात जास्त याच संघटनांनी विरोध केला. अमित शाह यांनी केलेलं वक्तव्य ही भाजपची जुनी मानसिकता आहेत. ती पुन्हा दिसून आली आहे. त्यात नवीन असं काही नाही, असे प्रकाश आंबेडकरांनी म्हटले.