पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ; म्हणाले
पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा ; म्हणाले
img
वैष्णवी सांगळे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. या दिवसाचं औचित्य साधून देशभरातील भाजप नेत्यांनी विविध उपक्रम राबवले. आता महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील मोठी घोषणा केली आहे. राज्यातील सर्व नगरपरिषदा व नगरपंचायतींमध्ये वैशिष्टयपूर्ण व नविन नगरपंचायत, नगरपालिका योजने अंतर्गत एक उद्यान विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येकी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करतानाच या उद्यानांना ‘नमो उद्यान’ नाव देण्याची घोषणा त्यांनी केली.

मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकला, ठाकरेंची सेना आक्रमक

या निर्णयामुळे राज्यातील एकूण ३९४ नगरपरिषद आणि नगरपंचायतींमध्ये नमो उद्यान वर्षभरात विकसित करण्यात येतील. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्राने दिलेली ही भेट असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. नव्याने विकसित झालेल्या या उद्यानांची विभागीय स्तरावर स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून प्रत्येक विभागातून ३ नगरपरिषद/नगरपंचायतींना बक्षिसे देखील देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केला आहे.


इतर बातम्या
Join Whatsapp Group