'आनंदाच्या शिधा'नंतर आणखी एक योजना बंद ? हे योजना बंद करणारे सरकार, दानवेंची टीका
'आनंदाच्या शिधा'नंतर आणखी एक योजना बंद ? हे योजना बंद करणारे सरकार, दानवेंची टीका
img
वैष्णवी सांगळे
निवडणूक जवळ आल्या कि योजनांचा पाऊस पडतो. निवडून आल्यानंतर यातील योजना सुरु केल्या जातात आणि कालांतराने त्या बंदही केल्या जातात.  हे प्रत्येक सरकारचंच. एकामामागोमाग योजना बंद होत असताना एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू केलेली 'मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा योजना'सुद्धा बंद करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. 


याआधी शिक्षण विभागातील स्वच्छता मॉनिटर, एक राज्य एक गणवेश, पुस्तकाला वह्यांची पान हे निर्णय सुद्धा मागे घेण्यात आले. एकाच शैक्षणिक वर्षात राबविण्यात आलेली ही योजना नोव्हेंबर उजाडला तरी राबवण्यात आलेली नाही.  त्यामुळे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू करण्यात आलेल्या आनंदाच्या शिधा या योजनेनंतर शिक्षण विभागातील माझी शाळा सुंदर शाळा ही योजना सध्या बंद करण्यात आल्याची माहिती आहे.

एकनाथ शिंदेंची आणखी एक योजन बंद पडल्याने शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सवर पोस्ट करत टोला लगावला आहे. सामान्यांना कणभर लाभाची अपेक्षा असलेल्या योजना बंद करून देवेंद्र फडणवीस सरकारने आपल्याच सहकाऱ्यांच्या निर्णयांवर फुल्या मारल्या आहेत. आमच्यातून गेलेले 'कटप्रमुख' मात्र यावर शब्द न बोलता महाशक्तीच्या लाडक्या बुलेट ट्रेनची री ओढताना आपल्याला दिसतील, असं अंबादास दानवेंनी म्हटलं आहे.

१. आनंदाचा शिधा- बंद! 
२. माझी सुंदर शाळा - बंद! 
३. १ रुपयात पीकविमा - बंद! 
४. स्वच्छता मॉनिटर - बंद! 
५. १ राज्य १ गणवेश - बंद! 
६. लाडक्या भावाला अपरेंटीसशिप - बंद! 
७. योजनादूत योजना - बंद! 
८. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना - बंद! 

योजना बंद करणारे हे चालू सरकार आहे. निवडणुकांपुरत्या या सगळ्या योजनांचा भंपकपणा जनतेपुढे निश्चित मांडू, असं अंबादास दानवे म्हणाले. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group