शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा कुठे होणार? समोर आली
शिंदे गटाचा दसरा मेळावा यंदा कुठे होणार? समोर आली "ही" महत्वाची माहिती
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यातून शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे. शिवसेना शिंदे गटाचा दसरा मेळावा बीकेसीमध्ये होणार आहे. बीकेसीमधील मैदानाची जागा निश्चित झाल्याने शिंदे गटाने तयारी देखील सुरु केल्याची माहिती मिळत आहे. 

दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात हा तिसरा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी तब्बल ४० हजार शिवसैनिकांसाठी बसण्याची व्यवस्था करण्याचे नियोजन करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. 

गेल्या वर्षी आझान मैदानात दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तर पहिला दसरा मेळावा हा बीकेसी येथेच पार पडला होता. मात्र, आझान मैदानात जागेची अडचण, पार्किंगची अडचण लक्षात घेता पुन्हा एकदा बैकेसी मैदानात हा मेळावा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group