राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण राजकारण ढवळून निघाले आहे. या भीषण दुर्घटनेनंतर आता शिवसेना (शिंदे गट) सतर्क झाली असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शिवसेना आता आपल्या पक्षीय कामासाठी किंवा नेत्यांच्या दौऱ्यांसाठी 'VSR' कंपनीच्या विमानांचा आणि हेलिकॉप्टरचा वापर करणार नाही.
राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांच्या अपघातानंतर व्हीआरएस कंपनीवर अनेक गंभीर आरोप आमदार रोहित पवारांनी केले होते. दरम्यान त्यात काही गोष्टी तथ्य असल्याचेही पुढं आलं होतं. अशातच आधीच संशयाच्या भोवऱ्यात असलेल्या व्हीआरएस कंपनीबाबत सातत्याने नवंनवीन दावा करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर व्हीएसआर कंपनीचे विमान न वापरण्याचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्णय घेतला आहे.
शिवसेनेच्या आमदारांनी या संदर्भात एकनाथ शिंदेंकडून सूचना केल्या होत्या. अशातच या मागणीचे गांभीर्य लक्ष्यात घेता हि मागणी मान्य केली आहे. त्यामुळे यापुढे शिंदे गटाचे नेते, मंत्री व्हीएसआरचे विमान वापरणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे.