राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निवडणुकीसाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. एकनाथ शिंदे यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठी खेळी खेळली आहे.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी शिंदेसेना आणि आणखी एका मोठ्या पक्षाची एंट्री होणार असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहे. शिवसेना शिंदेसेनेने रिपब्लिकन सेनेसोबत युती करत महायुतीची ताकद वाढवली आहे. मराठी आणि दलित मतदारांना आकर्षित करण्यासाठी डाव टाकल्याची चर्चा राजकीय राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज युतीची घोषणा करणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे दोन्ही पक्ष महापालिका आणि झेडपीच्या निवडणुका एकत्र लढणार आहेत. दरम्यान आनंदराज आंबेडकरांच्या पक्षासोबत युती करुन एकनाथ शिंदेंनी मराठी आणि दलित मतदार सोबत घेण्याची खेळी खेळल्याची राजकीय चर्चा आहे.