राज्य सरकारचा मोठा निर्णय :100 रुपयांचा स्टँप बंद , सर्वसामान्यांना भुर्दंड
राज्य सरकारचा मोठा निर्णय :100 रुपयांचा स्टँप बंद , सर्वसामान्यांना भुर्दंड
img
Dipali Ghadwaje
मुंबई : राज्यातून आत्ताच एक मोठी आणि तितकीच महत्वाची बातमी समोर आली आहे. सरकारी दस्तावेज असो किंवा साधी नोटरी करायची असो, तसेच बँकेतून कर्ज घ्यायचे असो सर्वसाधारणपणे नागरिकांना किंमान 100 रुपयांच्या स्टँप पेपवरुन दस्तावेज तयार करता येत होतो. 100, 200 आणि 500 रुपयांच्या स्टँपवर नागरिकाचा दस्तावेज ग्राह्य धरला जात होता. 

मात्र, यापुढे 100 आणि 200 रुपयांचे स्टँप पेप इतिहासजमा होणार आहेत. कारण, आता किमान 500 रुपयांच्या स्टँपवरच खरेदी, नोटरी, हक्क किंवा प्रतित्रापत्र दिले जाणार आहे.

राज्य सरकारने मुद्रांक शुल्क वाढीचा निर्णय घेतल्यामुळे महसूल विभागाकडून आता केवळ 500 रुपयांचे स्टँप जारी केला जातील. त्यामुळे, सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार आहे. राज्य शासनाने सरकारचा महसूल वाढविण्यासाठी हा निर्णय घेतल्याची माहिती आहे. 

तहसील किंवा महसूल कार्यलयात अवघ्या शंभर, दोनशे रुपयांत स्टँप केले जात. वैयक्तिक कारणांसह बँक व विविध कामांसाठी केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्रासह साठेखतानंतरचे खरेदीखत, हक्क सोडपत्रासाठी आता पाचशे रुपयांचे मुद्रांक शुल्क मोजावे लागणार आहे. 

हेही वाचा >>>> बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक, माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांचं निधन

स्थावर, जंगम मालमत्तेसाठीचा दस्तावेज

कंपन्यांच्या एकत्रीकरण, पुनर्रचना, विलिनीकरण तसेच विभागणीमध्ये विद्यमान किंवा भविष्यातील मतभेद मिटविताना लवादामार्फत लेखी निर्णय दिला जातो. कंपन्यांचे भागभांडवल मोठे असल्याने त्यांच्या स्थावर, जंगम मालमत्तेप्रकरणी अभिहस्तांतरणामध्ये सध्या पाचशे रुपये मुद्रांक शुल्क आकारणी होते. वाढीसाठी पाचशे रुपयांवरून चल व अचल मालमत्तेच्या बाजारमूल्यप्रमाणे दर बदलले जातात. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना 100 आणि 200 रुपयांच्या स्टँप पेपरवर त्यांचे दस्तावेज तयार करता येत होते. आता, त्यासाठी किमान 500 रुपयांच्या स्टँपवर दस्तावेजवर बनवावे लागणार आहेत. 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group