महत्त्वाचे ! भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; कारण...
महत्त्वाचे ! भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या ऑनलाइन सेवा ४ दिवस बंद; कारण...
img
वैष्णवी सांगळे
सध्या नागरिक डिजिटल सातबारे उतारे घेत आहेत. मात्र आता ४ दिवस डिजिटल सातबारे घेता येणार नाही.  कारण संगणकीय प्रणालीच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी भूमी अभिलेख आणि महसूल विभागाच्या सर्व ऑनलाइन सेवा आज गुरुवारपासून (दि.२) रविवारपर्यंत (दि. ५) तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार आहेत. या तांत्रिक समस्येमुळे नागरिकांना डिजिटल स्वाक्षरीचे उतारे, प्रॉपर्टी कार्ड आणि इतर ऑनलाइन सुविधांचा लाभ घेता येणार नाही. प्रभारी अतिरिक्त जमाबंदी आयुक्त विकास गजरे यांनी ही माहिती दिली.



दरम्यान , सलग चार दिवस या ऑनलाईन सेवा बंद राहणार असल्याने याबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. ज्या नागरिकांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार, बँकेचे कर्ज किंवा इतर कामांसाठी तातडीने डिजिटल स्वाक्षरीचे उतारे हवे आहेत, त्यांची मोठी गैरसोय होणार आहे. त्यांना आता चार दिवस वाट पाहावी लागणार आहे.

दि. २ दि. ५ एप्रिल  या कालावधीत महाभूमी पोर्टल आणि भूमी अभिलेख विभागाच्या डिजिटल सातबारा व ८-अ उतारा, मालमत्ता पत्रक, जमीन मोजणीची ‘क’ प्रत मिळवणे, फेरफार नोंदी , नोंदणी व मुद्रांक विभागाशी संबंधित काही महसूल सेवा या प्रमुख सेवा पूर्णपणे बंद राहणार असल्याचे भूमि अभिलेख विभागाने म्हटले आहे. सध्याच्या काळात नागरिक डिजिटल सातबारे उतारे घेत आहेत. त्यामुळे सलग ४ दिवस ऑनलाईन सेवा बंद राहणार असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group