अपली बॅंक खाती, मोबाइल नंबर सगळ्यालाच आधार कार्ड लिंक आहे. आपल्याला सगळ्या व्यवहारांसाठी आधार कार्डची गरच आहे. आणि आता आपली हीच प्रायव्हसी लक्षात घेऊन आधार कार्डमध्ये आवश्यक बदल केले जाणार आहेत.
सुरक्षा वाढवण्यासाठी आणि फसवणूक कमी करण्यासाठी आधार कार्डची डिझाइन बदलली जातेय. काय आहेत आधार कार्डचे नविन अपडेट जाणून घ्या.
आधार कार्ड हे आपलं सर्वात महत्त्वाचं डॉक्यूमेंट आहे. यूआयडीआयने नुकतंच नवीन आधार कार्ड अॅप लॉन्च केलं आहे. यानंतरही अनेक ठिकाणी, आधारची फोटोकॉपी जमा करावी लागते. अशावेळी कोणी आपल्या आधार कार्डच्या फोटोकॉपीचा चुकीचा वापर करू नये ही भीती कायम आपल्या मनात राहते. आता सरकारने हे सुधारण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.
द न्यू इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, नवीन डिझाइनमध्ये आधार कार्डवर फक्त फोटो आणि क्यूआर कोड असणार आहे. सध्या कार्डवर जी माहिती छापलेली असते, ती माहिती क्यूआर कोडमध्ये एन्क्रिप्टेड पद्धतीने सेव्ह केली जाईल. हे आधार अॅपच्या माध्यमातून स्कॅन करुन पाहिलं जाईल आणि तुमचं आधार कार्ड व्हेरिफाय केलं जाऊ शकेल. म्हणजेच आता आधार कार्डवर नाव, पत्ता, आधार नंबर नसणार आहे. यामुळे यूझर्सची प्रायव्हसी सुरक्षित राहील. तुम्ही कुठेही फोटोकॉपी वापरली तर तुमच्या माहितीचा चुकीचा वापर होण्याचा धोका तुम्हाला राहणार नाही.
नवं आधार कार्ड कसं असेल? : रिपोर्टनुसार, आधार कार्डची नवीन डिझाइन खुप वेगळी असेल. पहिले कार्डवर नाव, पत्ता आणि 12 अंकांचा आधार नंबर छापलेला असायचा. नवीन कार्डमध्ये फक्त तुमचा फोटो आणि एक सुरक्षित क्यूआर कोड असेल. या क्यूआर कोडचा फायदा असा होईल की, तुमचं नाव, पत्ता, जन्मतारिख आणि आधार नंबर आता कार्डवर नसतील. याऐवजी ही सर्व माहिती क्यूआर कोडमध्ये एन्क्रिप्टेड असेल.
का बदलणार आधार कार्ड ?
या बदलाचं सर्वात मोठं कारण म्हणजे, फसवणूक थांबवणे आणि लोकांची वैयक्तिक माहिती ही प्रायव्हेट ठेवणे. रिपोर्टनुसार, अनेकदा वेगवेगळ्या संस्था तुमच्या माहितीशिवाय आधार कार्ड स्टोअर करून ठेवतात. ज्यामुळे प्रायव्हसी आणि सुरक्षेला धोका असतो.
आधारवर तुमचा फोटो आणि फक्त क्यूआर कोड असेल तर कार्डचा चुकीचा वापर होण्याची शक्यता कमी होईल. UIDAI ने पहिलेच आधारच्या डिजिटल वापराला प्रोत्साहन देण्यासाठी अॅपचा नवीन व्हर्जन आणलं आहे. याच्या माध्यमातून डिजिटल पद्धतीने आधार शेअर करणं आणि आधार स्कॅन करुन माहिती कंफर्म करणं सोपं होतं. आता सरकार आधार कार्डमध्येही बदल करण्याचा विचार करत आहे.
तुम्हाला काय करावं लागणार?
रिपोर्टनुसार, सरकारने आधार व्हिजन 2032 अंतर्गत एक योजना तयार केली आहे. यासाठी विशेष उच्च-स्तरीय समिती बनवण्यात आली आहे. जी भविष्यातील सुरक्षा गरजा आणि डेटा प्रायव्हसीवर काम करतेय. यासाठी एक अशी व्यवस्था तयार केली जाईल, ज्यामध्ये कागदपत्रांवरील अवलंबित्व कमी होईल आणि डिजिटल फर्स्ट सिस्टममध्ये व्हेरिफिकेशन वेगाने आणि सोपं होईल.