रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट कपातीनंतर चार प्रमुख सरकारी बँकांनी आपल्या कर्ज व्याजदरांमध्ये कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि MSME कर्ज घेणाऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते.
RBI ने नुकताच रेपो दरात कपात केल्यानंतर UCO Bank, Bank of India, PNB आणि Bank of Baroda यांनी आपापल्या Repo Linked Lending Rates कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे आता नवीन कर्ज घेणाऱ्यांना तसेच विद्यमान ग्राहकांनाही EMI मध्ये काहीसा दिलासा मिळणार आहे.
कोणत्या बँकेने किती केली व्याजदर कपात? :
युको बँक : RLLR मध्ये 50 बेसिस पॉइंट्सनी कपात केली आहे. त्यामुळे गृहकर्ज आणि वैयक्तिक कर्ज घेणाऱ्यांसाठी दर आता कमी झाले आहेत.
बँक ऑफ इंडिया : 10 जून 2025 पासून RLLR 9.25% वरून 8.75% करण्यात आली आहे. हा दर नवीन गृहकर्ज, वाहन कर्ज आणि MSME कर्जासाठी लागू होईल.
पंजाब नॅशनल बँक : RLLR 9.60% वरून 9.10% करण्यात आली आहे. नवीन दर 10 जूनपासून लागू होणार असून, ग्राहकांच्या EMI मध्ये थेट घट होणार आहे.
बँक ऑफ बडोदा : 7 जूनपासून BRLLR 8.65% वरून 8.15% करण्यात आली आहे. विद्यमान आणि नवीन कर्ज ग्राहकांना याचा फायदा मिळणार आहे.
कर्ज घेणाऱ्यांसाठी फायदे :
- गृहकर्ज व वाहन कर्जाच्या EMI मध्ये घट
- MSME व्यवसायांना आर्थिक दिलासा
- नवीन ग्राहकांसाठी स्वस्त कर्जाची संधी
- विद्यमान ग्राहकांना रिव्हिजन नंतर फायदेशीर दर