२२ जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सरकारी बँक आणि वीमा कंपनी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. अयोध्यामध्ये बँक, विमा कंपनी आणि क्षेत्रीय ग्रामीण बँकांना २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी असणार आहे. उत्तर प्रदेशातील कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागने केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्यागिक संस्थांना याविषयीचा आदेश देण्यात आलाय.
कर्मचारी विभागाने केंद्र सरकारच्या सर्व मंत्रालय आणि विभागांना दिलेल्या आदेश म्हटलं की, अयोध्येत २२ जानेवारीला २०२४ रोजी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा संपूर्ण भारतभरात साजरा केला गेला पाहिजे. कर्मचाऱ्यांना सुट्टी दिल्यास सर्व कर्मचारी हेदेखील या कार्यक्रमात सहभागी घेऊ शकतील.
यामुळे संपूर्ण भारतात सर्व कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक संस्था २२ जानेवारी २०२४ला दुपारी अडीच वाजेपर्यंतच कार्यालयीन काम असणार आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी एक नोटीस पाठवत डीओपीटीचा आदेश सार्वजनिक क्षेत्राच्या वित्तसंस्था आणि आरबीआयला देखील लागू राहील. ज्यामुळे सर्व सरकारी कर्मचारी रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होऊ शकतील.
दरम्यान केंद्र सरकारनेही २२ जानेवारी रोजी अर्धा दिवस सुट्टी जाहीर केलीय. रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होण्यासाठी अनेक भाविकांची मोठी इच्छा होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. या दिवशी अर्धा दिवस सुट्टी देण्यात आलीय.