प्रभू रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत - पंतप्रधान नरेंद्र मोदी
प्रभू रामलल्ला आता तंबूत राहणार नाहीत - पंतप्रधान नरेंद्र मोदी
img
Dipali Ghadwaje
अयोध्येत श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा आणि रामलल्लाच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित साधू, संतांशी, निमंत्रितांशी आणि देशाशी संवाद साधला. त्यांनी आजच्या सोहळ्याच्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींनी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याच्या भावना व्यक्त केल्या.

आपले राम आता तंबूत राहणार नाहीत...
"अनेक शतकांच्या प्रतिक्षेनंतर आपला राम आला आहे. या शुभप्रसंगी मी देशवासियांना शुभेच्छा देतो. माझं शरीर अजूनही त्या क्षणांमध्ये गढून गेले आहे. आपले राम आता तंबूत राहणार नाहीत, भव्य मंदिरात राहतील," असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले. यावेळी काही क्षण पंतप्रधान मोदी भावुक झाल्याचेही पाहायला मिळाले.

प्रभूरामांची माफी मागतो..
"मी प्रभू श्रीराम यांच्यापुढे आज नतमस्तक होतो. त्यांची माफी मागतो. आमच्या त्याग, तपस्येमध्ये काही त्रुटी राहिल्या असतील. कारण इतक्या वर्षात हे काम झाले नाही. मला विश्वास आहे की प्रभू श्रीराम आपल्याला नक्की माफ करतील," अशी भावना पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केली.
 
राम भारताची प्रतिष्ठा
"काही लोक म्हणत होते राम मंदिर तयार झालं तर भारतात आग लागेल. असे लोक भारताचा सामाजिक भाव समजू शकले नाहीत. राम मंदिराची उभारणी कुठली आग नाही, तर एक ऊर्जा निर्माण करत आहे. राम अग्नी नसून ऊर्जा आहे. राम उपाय आहे, वाद नाही, राम ही आग नाही तर उर्जा आहे, राम भारताची प्रतिष्ठा आहे, राम मित्रता आहे, विश्व आहे, "असेही पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group