रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी : वेटिंग तिकिटसंदर्भात रेल्वेचा मोठा निर्णय , आत्ताच जाणून घ्या
रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी : वेटिंग तिकिटसंदर्भात रेल्वेचा मोठा निर्णय , आत्ताच जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
जर तुमच्याकडे वेटिंग तिकीट असेल आणि तुम्ही रेल्वेने प्रवास करणार असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रेल्वेने वेटिंग तिकीटांसंदर्भात एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

चेंगराचेंगरी आणि गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी, वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना रेल्वे स्थानक आणि प्लॅटफॉर्मवर प्रवेश दिला जाणार नाही, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी जाहीर केले. 

रेल्वे स्थानकांवर गर्दी अनियंत्रित झाल्याने चेंगराचेंगरीसारख्या दुर्घटना घडतात. अलीकडेच मुंबईतील बांद्रा स्थानक आणि नवी दिल्ली येथे अशा घटना घडल्या.

महाकुंभासाठी दिल्लीच्या स्थानकावर प्रचंड गर्दी उसळली होती. प्रमाणापेक्षा जास्त तिकीट विक्रीमुळे ही गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू झाला. या परिस्थितीवर उपाय म्हणून रेल्वेने आता कठोर पावले उचलली आहेत.

आता फक्त ट्रेनमधील उपलब्ध जागांनुसारच तिकीटे विकली जातील. त्यामुळे वेटिंग तिकीट असलेल्या प्रवाशांना स्थानकात प्रवेश नाकारला जाईल, असे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी संसदेत सांगितले. दरम्यान गर्दी व्यवस्थापनासाठी अनेक उपाययोजना त्यांनी जाहीर केल्या.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group