पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 6405 कोटी रुपयांच्या दोन महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
यामध्ये झारखंडमधील कोडरमा-बरकाकाना रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण आणि कर्नाटक-आंध्र प्रदेशातील बेल्लारी-चिकजाजूर रेल्वे मार्गांचे दुपदरीकरण समाविष्ट आहे. या प्रकल्पांमुळे प्रादेशिक विकास, रोजगार निर्मिती आणि मालवाहतूक क्षमता वाढणार असल्याचा अंदाज आहे.
यामध्ये झारखंड, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या भारतीय रेल्वेच्या दोन मल्टीट्रॅकिंग प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली.
केंद्र सरकारच्या मते, या उपक्रमांमुळे प्रवासाची सोय सुधारेल, लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल, कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन कमी होईल. यामुळे शाश्वत आणि कार्यक्षम रेल्वे ऑपरेशन्सला चालना मिळेल.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, कोडरमा ते बरकाकाना दरम्यान 133 किमी दुहेरी मार्गाला मंजुरी देण्यात आली आहे. याची किंमत 3,063 कोटी रुपये आहे. यामुळे पाटणा आणि रांचीमधील अंतर कमी होईल. यामुळे कोडरमा, छत्र, हजारीबाग आणि रामगड जिल्ह्यांना चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल.
झारखंडमधील भारतीय रेल्वेच्या कोडरमा-बरकाकाना मल्टीट्रॅकिंग प्रकल्पाबद्दल केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, तज्ञांच्या गणनेनुसार या प्रकल्पातून कार्बन डायऑक्साइडचे प्रमाण सात कोटी झाडे लावण्याइतके असेल.
यामुळे देशातील दरवर्षी 32 कोटी लिटर डिझेलची बचत होईल. याचा फायदा 938 गावांना आणि 15 लाख लोकसंख्येला होईल. रस्त्याने माल पाठवण्यापेक्षा पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून चांगले ठरेल.
बल्लारी-चिकजाजूर मल्टीट्रॅकिंग प्रकल्पाला मंजुरी
केंद्र सरकारने कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये भारतीय रेल्वेच्या बल्लारी-चिकजाजूर मल्टीट्रॅकिंग प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प दुहेरी मार्गाचा असेल. यामुळे मंगलोर बंदराशी संपर्क सुधारेल. याबद्दल रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत 185 किमी रेल्वे मार्ग दुहेरी केला जाईल. यासाठी 3,342 कोटी रुपये खर्च येईल.
पंतप्रधान मोदींच्या ऐतिहासिक तिसऱ्या कार्यकाळात, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स खर्च कमी करण्यासाठी अनेक प्रकल्प सुरू करण्यात आले आहेत.