खुशखबर ! आता रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच ॲपमध्ये, लवकरच लॉन्च करणार Super App
खुशखबर ! आता रेल्वेच्या सर्व सुविधा एकाच ॲपमध्ये, लवकरच लॉन्च करणार Super App
img
Dipali Ghadwaje
भारतीय रेल्वे मोठ्या वेगाने बदलत आहे. भारतीय रेल्वे आताच्या घडीला अनेक प्रकल्पांवर काम करत आहे. आगामी काही वर्षांत प्रवाशांच्या सोयीसाठी आणि सुलभतेसाठी सुरू असलेले हे प्रकल्प अमलात येतील.   नवीन गोष्टी आणत आहे. त्यात आता रेल्वे सुपर अ‍ॅप आणत आहे. रेल्वेच्या अनेक सुविधा या एका अ‍ॅपवर आता मिळू शकतील.

तसेच रेल्वेचे तिकीट बुक करणे, रेल्वे ट्रॅक करणे, जेवण ऑर्डर करणे, तक्रार दाखल करणे, अशा अनेक सुविधा या एकाच अ‍ॅपवर उपलब्ध करण्यात येणार आहेत. 

यासाठी रेल्वे मंत्रालयाने ९० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. CRIS या अ‍ॅपची निर्मिती करणार आहे. रेल मदद, UTS, NTES, पोर्टरीड, सतर्क, IRCTC रेल कनेक्ट, IRCTC ई-केटरिंग, IRCTC एअर अशा रेल्वेच्या अनेक सुरू असलेल्या सुविधा सुपर अ‍ॅपमध्ये एकाच ठिकाणी मिळणार आहेत.

त्यामुळे आता अनेक अ‍ॅपचे काम एकच अ‍ॅप करणार सुपर अ‍ॅपमुळे रेल्वेशी संबंधित गोष्टी प्रवाशांसाठी अधिक सोयीच्या होणार आहेत. रेल्वेचे अनेक अ‍ॅप आहेत. ते चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. लाखो प्रवासी त्याचा उत्तम लाभ घेत आहेत. मात्र, या अनेक अ‍ॅपचे काम आता एकच अ‍ॅप करणार आहे. 

सध्या तिकीट बुकिंगसाठी रेल्वेचे IRCTC अ‍ॅप उपलब्ध आहे. रेल्वेच्या अन्य सुविधांसाठी वेगवेगळी अ‍ॅप्स आहेत. दरम्यान, चालु आर्थिक वर्षामध्ये झालेल्या एकूण रेल्वे तिकीट बुकिंगपैकी सुमारे ५,६०,००० बुकिंग्स IRCTC अ‍ॅपच्या माध्यमातून करण्यात आल्या होत्या. ही संख्या एकूण बुकिंगच्या निम्मी आहे. मोठ्या प्रमाणात लोक IRCTC अ‍ॅपचा वापर करत आहेत. आता रेल्वेने इतर सुविधा एकाच अ‍ॅपमध्ये दिल्यास आणखी लोक याचा वापर सुरू करतील, असे सांगितले जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group