मध्य रेल्वेने रविवारी 7 जुलै रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक केला आहे. ब्लॉक कालावधीत अनेक लोकल उशिराने धावणार आहेत, तर काही रद्द करण्यात आल्या असून काहींचा मार्ग बदलण्यात आला आहे. तसेच याचा परिणाम मेल आणि एक्सप्रेसवरही होणार आहे. त्यामुळे घराबाहेर पडण्यापूर्वी मेगा ब्लॉकचे संपूर्ण वेळापत्रक पाहून प्रवासाचे नियोजन करा.
रविवारी सकाळी 10.50 ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत मध्य मार्गावर मेगा ब्लॉक असणार आहे. याकाळात उपनगरीय लोकल गाड्यांच्या मार्गात बदल करणअयात आला आहे. BL-13 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.46 वा. ते AN-15 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 2.42 वा. डाऊन जलद/निम जलद लोकल ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील
त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील व त्यांच्या नियोजित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने स्थानी पोहोचतील, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.
अप जलद/निम जलद लोकल A-26 कल्याण येथून सकाळी 10.28 वा. ते BL-40 कल्याण येथून दुपारी 3.17 वा. कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवल्या जातील आणि त्यांच्या नियोजित थांब्यांव्यतिरिक्त दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकावर थांबतील. तसेच पुढे ठाणे स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल आणि त्यांच्या नियोजित वेळेच्या 10 मिनिटे उशिराने व्यस्थानी पोहोचतील.