खळबळजनक ! धावत्या रेल्वेचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू
खळबळजनक ! धावत्या रेल्वेचा भीषण अपघात, १५ जणांचा मृत्यू
img
वैष्णवी सांगळे
पोर्तुगालमधून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोर्तुगालच्या लिस्बनमध्ये भीषण रेल्वे दुर्घटना घडली आहे. या रेल्वे दुर्घटनेत १५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण जखमी झाले आहेत. लिस्बनमध्ये हा सर्वात जुना रेल्वे मार्ग असल्याची माहिती मिळत आहे. ही रेल्वे स्थानिकांसाठी लाईफलाइन आहे.

नाशिक : दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या रागातून पत्नीची हत्या

अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.पोर्तुगालच्या आरोग्य मंत्रालयाचे प्रमुख टियागो ऑगस्टो यांनी दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. भीषण दुर्घटनेतील मृतांमध्ये पोर्तुगालमधील नागरिक, परदेशी पर्यटकांचा समावेश आहे. 

पुढील ४८ तास धोक्याचे ! भारतीय हवामान विभागाचा मोठा इशारा

केबल तुटल्याने रेल्वेचा ट्रॅकवरून तोल गेला. त्यानंतर ट्रेन उलटून इमारतीला आदळली. या भीषण दुर्घटनेत रेल्वेचा चक्काचूर झाला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवले आहे. या घटनेने परिसरात धावपळ उडाली आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group