रेल्वे इंजिनचा धक्का लागल्याने महिलेचा तुटला  कान; लोहमार्ग पोलिसांमुळे वाचले महिलेचे प्राण
रेल्वे इंजिनचा धक्का लागल्याने महिलेचा तुटला कान; लोहमार्ग पोलिसांमुळे वाचले महिलेचे प्राण
img
Chandrakant Barve

नाशिकरोड (प्रतिनिधी) :-चालत्या रेल्वे इंजिनचा धक्का लागल्याने एका महिलेचा कान तुटून ती जखमी झाली; मात्र लोहमार्ग पोलिसांच्या सतर्कमुळे महिलेला तत्काळ उपचार मिळाले आणि तिचा जीव वाचला. कल्पना भागवत चौधरी (वय 54, रा. जय भवानी रोड, नाशिकरोड) या काही अंशी मनोरुग्ण असलेल्या महिलेला मुंबईवरून भुसावळकडे जाणाऱ्या गीतांजली एक्स्प्रेसच्या इंजिनचा जबर धक्का लागला.

त्यात त्यांचा कान तुटून पडला, तर डोक्याला गंभीर इजा झाली. ही माहिती लोहमार्ग पोलीस कर्मचारी भगवान बोडके यांना समजली व चालती गाडी थांबल्याने स्थानकावर असलेले गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संतोष उफाडे-पाटील, रघुनाथ सानप, रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचारी शोभा मोटे यांनी घटनास्थळी धाव घेतली. विलंब न करता जखमी महिलेला अनिल नागपुरे व इरफान शेख यांच्या मदतीने बिटको रुग्णालयात दाखल करण्यात आले.

घटनास्थळी तुटून पडलेले जखमी महिलेचे सोन्याचे मंगळसूत्र, कर्णफूल हे तिचे पती भगवान थोरात यांच्या ताब्यात देण्यात आले. पत्नीचा जीव वाचविल्याबद्दल पतीने भावविवश होत लोहमार्ग पोलिसांचे ऋण व्यक्त केले. प्रभारी पोलीस निरीक्षक महेश कुलकर्णी यांनी कर्मचारी यांचे कौतुक केले.


इतर बातम्या
Join Whatsapp Group