गोराई बिचवर एका महिलेचा मृतदेह आढळून आला. या मृतदेहाचे सात तुकडे केलेत. एका प्लास्टिक बॅगमध्ये मृतदेहाचे तुकडे गोणीत गुंडळाले होते. हत्या झालेल्या व्यक्तीचे वय साधरण ३० वर्ष असावं असा अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान बीचवर मृतदेह आढळून आल्यानंतर याप्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आलाय. त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यानंतर पोलिसांनी मृतदेहाला पोस्टमार्टमसाठी पाठवला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अद्याप मृतदेहाची ओळख पटली नसून गोराई पोलिसांनी प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केलाय.
गोराई पोलिसांनी मुंबईतील बाबरपाडा भागातील शेफाली गावातून मृतदेह ताब्यात घेतलाय. फॉरेंसिक टीम या घटनास्थळी पोहोचले असून येथील जागेची तपासणी केली जात आहे. तसेच पंचमाना केला जात आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एक विशेष पथक तयार केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे.