बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ! जन्मदात्याचा पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना ! जन्मदात्याचा पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार
img
DB
बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना जालन्यामध्ये घडली आहे. या घटनेमुळे जालन्यामध्ये खळबळ उडाली आहे.

२०१८ पासून आरोपी आपल्या मुलीवर वारंवार बलात्कार करत होता. कोणाला सांगितले तर जीवे मारण्याची धमकी देत होता. याप्रकरणी जालन्यातील मौजपुरी पोलिस ठाण्यात बापाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जालन्यात जन्मदात्या बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. या नराधम बापाने २०१८ पासून स्वतःच्याच मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी वारंवार बलात्कार केला. मुलीला धमक्या देत आरोपी तिच्यावर बलात्कार करत होता. कुणाला काही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली त्यामुळे मुलगी घाबरली होती असल्याची माहिती समोर आली आहे.

यासंदर्भात मुलीच्या फिर्यादीवरून जालन्यातील मौजपुरी पोलिस ठाण्यात पोस्को कायद्यांतर्गत आरोपीविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जालना पोलिसांनी आरोपी बापाविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर भोजपुरी पोलिसांनी त्याला अटक केली.

आरोपीने मुलीवर २०१८, २०२२, २०२३ आणि २०२५ मध्ये बलात्कार केल्याची माहिती मुलीने पोलिसांना तक्रार देताना दिली. या घटनेमुळे जालना हादरले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group