हिमाचल प्रदेशात आजी नातवाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शिमला जिल्ह्यातील रोहरू चिडगाव पोलीस स्टेशन परिसरातील एका वृद्ध महिलेवर तिच्याच नातवाने बलात्कार केला आहे. पीडितेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा सध्या सखोल तपास सुरू आहे. धक्कादायक बाब म्हणजे, हा गुन्हा करणारा आरोपी विवाहित असून, दोन मुलांचा बाप आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी या गुन्ह्याची तक्रार प्राप्त झाली. चिडगाव पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्ष कुमार (वय वर्ष २५) असे आरोपीचे असून, आरोपी चिडगावातील रहिवासी आहे. मंगळवारी सायंकाळी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पीडितेनं तक्रारीत म्हटलं की, पतीच्या निधनानंतर पीडित महिला तिच्या घरात एकटी राहायची. ३ जुलैला दुपारी आरोपी नातू घरात घुसला. नंतर तिच्यावर जबरदस्ती करून लैंगिक अत्याचार केला. उघड केल्यास आरोपीने महिलेला जीवे मारण्याची धमकी दिली.
पीडित महिलेनं चिडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली. तसेच आरोपीविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला.