संतापजनक घटना ! पाच वर्षीय मुलीवर बलात्कार
संतापजनक घटना ! पाच वर्षीय मुलीवर बलात्कार
img
Dipali Ghadwaje
उरणमधील घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रा त खळबळ उडाली आहे. दाऊद शेख नावाच्या एका आरोपीने २२ वर्षीय यशश्री शिंदेची हत्या केलीये. तिच्या मृतदेहाची विटंबना करण्यात आली आहे. हि घटना ताजी असतांनाच  शिवडी परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका पाच वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाच वर्षीय चिमुरडीवर शेजाऱ्यानेच बलात्कार केला आहे.  सदर घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.एका वृत्त संस्थेने याबाबतचे वृत्त दिलं आहे. चिमुरडी खेळत असताना शेजाऱ्याने तिला उचलून स्वतःच्या घरी नेलं आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. 

याप्रकरणी आर.ए.के मार्ग पोलिसांनी ३० वर्षीय नराधमाला अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम ६५(२) आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्याच्या कलम ४, ८ आणि १२ अंतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.
crime | rape | girl |
इतर बातम्या
Join Whatsapp Group