नागपुरातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. शहराच्या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोधनी परिसरातील प्रकाशनगरमध्ये भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.
शहराच्या गजबजलेल्या भागात ही घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. अवैध धंद्यांच्या वादातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील तपास सुरू केला आहे. तर यातील आरोपींचा ही पोलीस सध्या शोध घेत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान दुचाकी वर आलेल्या चार हल्लेखोरांनी अचानक येऊन शिवीगाळ सुरू केली, आणि एका तरुणाबद्दल चौकशी करत गोळीबार केला. त्यात सोहेल खान नावाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रकाशनगर येथील गोविंद लॉनजवळ रात्री साडेनऊ ते दहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली.
या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. काही संतप्त तरुणांनी घोषणाबाजी करत काही दुचाकींवर दगडफेक ही केल्याची माहिती आहे.
दरम्यान, अवैध धंद्यांच्या वादातून हा प्रकार झाला असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सध्या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे. मात्र भर बाजारात गोळीबार झाल्याची घटना घडल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.