नागपूर : घरात दारू पिऊन वडिल आईला नेहमी शिवीगाळ करून मारहाण करायचे. हा त्रास नेहमीचाच झालेला असल्याने या त्रासाला कंटाळून संतापलेल्या मुलानेच वडिलांचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नागपूरमध्ये उघडकीस आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , वडिलांचा खून केल्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावत असताना मात्र हा मुलगा अडकला. यानंतर प्रकरण पोलिसात पोहचल्यानंतर मुलगा व आईला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
या घटनेत मुकेश शेंडे (वय ५७) असे मृत झालेल्या इसमाचे नाव आहे. नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याअंतर्गत इंगोलेनगर परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. मुकेश हा हार्डवेअरच्या दुकानात काम करायचा. मात्र त्याला दारूचे व्यसन असल्याने तो दररोज दारू पिऊन घरी यायचा. दारूच्या नशेत घरी येत पत्नीला व दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या मुलाला शिवीगाळ करत आणि मारहाण करत होता. रोज होणाऱ्या या त्रासाला मुलगा व पत्नी देखील त्रासले होते.
आईला शिवीगाळ करत असल्याचे पाहून मुलगा चिडला दरम्यान घटनेच्या दिवशी रात्री देखील मुकेश दारूच्या नशेत घरी आला आणि पत्नीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. रोजचा विषय असल्यानं पत्नी उर्मिलाने दुर्लक्ष करत स्वतांपाक करण्यास लागली. स्वयंपाक करण्यास उशीर झाल्याने मुकेशने पुन्हा शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.
याच दरम्यान मुलगा घरी परतला होता. आईला वडील शिवीगाळ होताना पाहून तो चिडला. त्याचा राग अनावर झाला शाब्दिक वाद हाणामारीत बदललं. मुलगा व पत्नी ताब्यात मुलाने दारूच्या नशेत असलेल्या वडिलांना बेडवरून खाली ओढले. यावेळी दोघात हातापायी झाली.
त्यामुळे मुलाच्या नाकाला दुखापत झाली. यामुळे मुलाने रागाच्या भरात वडील मुकेश यांचा टॉवेलने गळा आवळून खून केला. यानंतर मुकेश शेंडे याचा मृतदेह पोत्यात बांधून नदीत फेकण्याचा तयारीत असताना प्रकरण पोलिसात पोहचले. यानंतर पोलिसांनी अल्पवयीन मुलगा आणि मुकेशची पत्नी उर्मिलाला अटक केली.