सावध व्हा ! कोणी पाण्याचा बहाणा करून तर कोणी पार्सल देण्याचं बहाणा करत सोनं लंपास करतंय
सावध व्हा ! कोणी पाण्याचा बहाणा करून तर कोणी पार्सल देण्याचं बहाणा करत सोनं लंपास करतंय
img
वैष्णवी सांगळे
चेन स्नॅचिंग आणि मोबाईल हिसकावून घेण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. नाशिक शहरातील रामवाडी परिसरात चोरट्यांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने नंदिनी नायक या महिलेचा पाठलाग करून इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर या चोरट्यांनी त्यांच्याकडे पाणी मागण्याचा बहाणा करत घरात प्रवेश केला. यावेळी पाण्याची बाटली परत करताना चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील तीन तोळ्यांची सोन्याची पोत लंपास केली. यावेळी त्यांनी एका चोरट्याचा शर्ट ओढून पकडण्याचा प्रयत्न केला. पंरतु, तो हातातून निसटला. त्यामुळे दोघेही चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. 

नाशिक हादरले; सिडकोत एकाची दगडाने ठेचून हत्या

आता नागपुरातील अजनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत देखील असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात आरोपीने चक्क पार्सल देण्याच्या बहाण्याने एका महिलेच्या घरात प्रवेश केला आणि तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. अश्विनी मेश्राम यांच्या घरी ही घटना घडली. ज्यावेळी त्या घरात एकट्या होत्या, तेव्हा एक अनोळखी व्यक्ती पार्सल घेऊन आल्याचे सांगत त्यांच्या घरी पोहोचला. 

भीषण अपघात ! उड्डाणपुलावर स्कूल व्हॅनची बसला जोरात धडक, दोघांचा मृत्यू

अश्विनी यांना वाटले की त्यांच्या मुलीने जेवणाचे पार्सल पाठवले असेल, म्हणून त्यांनी कोणताही संशय न घेता दरवाजा उघडला. त्या व्यक्तीने त्यांना एका कागदावर सही करण्यास सांगितले. अश्विनी सही करत असतानाच, अचानक त्या आरोपीने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. या झटापटीत मंगळसूत्रातील 3 ग्रॅम सोन्याचा भाग आरोपीच्या हातात आला आणि तो घेऊन त्याने तात्काळ पळ काढला. चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group