नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी):- गस्तीवर संशयित वाहन चालकांवर कारवाई करीत असताना पळण्याच्या तयारीत असलेल्या युवका कडून उपनगर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सुमारे साडेदहा लाख रुपये किमतीच्या १० दुचाकि व चार मोबाइल हस्तगत केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी दिली .
नासिक रोड उपनगर व परिसरात चोऱ्यांच्या प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी गुन्हे शोध पथकांना चोरी गेलेल्या दुचाकी शोधण्याबाबत आदेशित केले होते.त्या अनुषंगाने शिवाजीनगर येथे वाहन तपासणी असलेल्या पोलीस हवालदार विनोद लखन यांनी एका नंबर नसलेली दुचाकी घेऊन जाणाऱ्या संशयित युवकास हटकले मात्र तो पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला शिताफीने ताब्यात घेतले असते त्याच्याकडून दहा लाख ७० हजार रुपये किमतीच्या १० दुचाकी व चार मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे.
अनिकेत उर्फ अंड्या पप्पू शार्दुल वय 20 राहणार गंगापूर गाव गोवर्धन राजनगर हा दुचाकी चोर आहे. त्याने चोरलेल्या मोटर सायकल दुगाव व गंगापूर डॅम परिसरात लपवून ठेवल्या होत्या.
या कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे,पोलीस निरीक्षक संजीव फुलपगार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश गवळी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद शेजवळ, पोलीस हवालदार विनोद लखन, इमरान शेख, संदीप हिवाळे,सुरज गवळी, सौरभ लोंढे, संदेश रंगतवान,जयंत शिंदे, सौरव गवळी, अनिल शिंदे, सुनील गायकवाड, उदय शिरसाठ व होमगार्ड कर्मचारी सहभागी झाले होते.