बोगस शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात मोठी माहिती समोर आली आहे. नागपूर विभागातील शालार्थ आयडी घोटाळ्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. ५ महिन्यांपूर्वी हे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु असून सायबर पोलिसांकडून आतापर्यंत तपासलेल्या १ हजार ८० आयडीमधून ६८० शिक्षकांचे आयडी बोगस असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या ६८० बोगस शिक्षकांवर अटकेची टांगती तलवार आहे.
हे ही वाचा
उपसंचालक उल्हास नरड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या समितीने विभागातील २३३ शिक्षकांचे शालार्थ आयडी बनावट असल्याचा अहवाल सादर केला होता. त्या आधारेच सायबर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली होती. १२ मार्चला सायबर पोलिसांकडे या प्रकरणात पहिल्यांदा गुन्हा दाखल झाला. सायबर पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असताना एक एकाची नावं समोर येऊ लागली.
हे ही वाचा
शालार्थ घोटाळ्यातील मुख्य आरोपी निलेश वाघमारेला पोलिसांनी अटक केली. पण या प्रकरणातील आरोपी माजी उपसंचालक सतीश मेंढे अद्यापही फरार आहे. तर ६८० बोगस शिक्षकांना पोलिसांकडून अटक करण्यात येणार असल्याचे संकेत एसआयटीकडून मिळाले आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. येणाऱ्या दिवसात हे प्रकरण नेमकं काय वळण घेईल हे पाहणं महत्त्वाचं असेल.