राज्यात राजकीय घडामोडींना वेग , फडणवीस-शिंदे-अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक
राज्यात राजकीय घडामोडींना वेग , फडणवीस-शिंदे-अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक
img
Dipali Ghadwaje
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महायुती सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार पार पडला.

यावेळी महायुतीच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. महायुतीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर काही माजी मंत्र्यांना डच्चू देण्यात आला. आता पुढील काही तासात मंत्रिमंडळाचे खातेवाटप होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , मंत्रिमंडळ विस्तारानंतर आज खातेवाटप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिवाळी अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आजच महायुती सरकारचे खातेवाटप होणार असल्याचे बोललं जात आहे. पुढच्या काही तासात महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

फडणवीस-शिंदे-अजितदादांमध्ये महत्त्वाची बैठक

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घरी चहापानासाठी जाणार आहेत. यावेळी या तिघांमध्ये एक बैठक होईल. या बैठकीत हे तिघेही खातेवाटपावर चर्चा करतील. या चर्चेनंतर खातेवाटपाबद्दल घोषणा केली जाईल, असे म्हटले जात आहे.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group