देशातील १०२ जागांवर मतदान होत असून त्यात महाराष्ट्रातील पाच जागा आहेत. सकाळी ७ वाजता सुरु झालेले मतदान संध्याकाळी ६ पर्यंत चालणार आहे. पहिल्या टप्प्यात आज पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा - गोंदिया, गडचीरोली आणि चंद्रपूर मतदारसंघात मतदान होणार आहे. नागपूरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे. सकाळपासून मतदानाची लगबग दिसून येत आहे.

अशातच रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये जिवंत माणसाला मतदार यादीत मृत दाखवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
राजेराम चैतु खंडाते, असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीच्या नावावर मतदार यादीत डिलीटेड शिक्का मारल्यात आला आहे. पण ही व्यक्ती मृत नसून अजून जिवंत आहे. जेव्हा ही व्यक्ती मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावरही पोहोचली. तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रकारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
रामटेक लोकसभा मतदार संघातील पारशीव गावातील झेडपीच्या शाळेत एक वोटिंग सेंटर आहे. तिथल्या बूथ क्रमांक २७० वर हा सगळा प्रकार समोर आलाय. राजेराम चैतु खंडाते हे जिवंत आहेत. मतदार यादीत मृत दाखवल्यानं आता मतदानाचा हक्क बजावायचा कसा? असा प्रश्नही त्यांनी पडला होता.
या घटनेनंतर मतदान केंद्रावर काही वेळासाठी गोंधळ निर्माण झाला होता. या घटनांंमुळे आता प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. जिवंत व्यक्तीला मृत दाखवल्याचा धक्कादायक प्रकार नागपूरमध्ये उघडकीस आला आहे. हा सगळा प्रकार समोर आल्यानंतर वोटिंग सेंटरवर असलेल्या अधिकाऱ्याला विचारणा कऱण्यात आली.
त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना विचारुन बॅलेट पेपरवर राजेराम खंडाते यांचं मत नोंदवून घेतलं जाईल, असं सांगितलं जात आहे. मतदानाच्या पहिल्याच टप्प्यात समोर आलेल्या या भोंगळ कारभारने चर्चांना उधाण आलंय.