स्वयंपाक केला पांढरा भात बनवला पण याच भाताने तरुणीनं जीव गमावला, 'ही' छोटी चूक बनली मृत्यूचं कारण
स्वयंपाक केला पांढरा भात बनवला पण याच भाताने तरुणीनं जीव गमावला, 'ही' छोटी चूक बनली मृत्यूचं कारण
img
वैष्णवी सांगळे
बाहेरच खाणं टाळा अन घरचं खा म्हणजे काही आजार होणार नाही असं म्हटलं जातं पण घरचंच अन्न खाऊन एका तरुणीला जीव गमवावा लागला आहे. याचा अर्थ हा नाही की आम्ही तुम्हाला घरचं अन्न खाऊ नका असं सांगतोय , याच अर्थ हा की स्वयंपाक करताना एक छोटी चूक तरुणीला अशी महागात पडली की ज्यामुळे तिचा मृत्यू झाला आहे. 

प्रकरण नेमकं काय ? 
नागपूरच्या बहादुरा रोड परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणीला भात खाणं जीवावर बेतलं आहे. माही किशोर उमाळे असं मृत पावलेल्या १७ वर्षीय तरुणीचं नाव आहे. ती नागपुरच्या बहादुरा रोड परिसरातील मानवशक्ती सोसायटीत आपल्या कुटुंबासमवेत राहते. घटनेच्या दिवशी २० डिसेंबर रोजी तिने आपल्या घरात जेवण बनवलं होतं. यावेळी तिने भातही केला होता. जो खाऊन तिचा मृत्यू झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरमधील बहादुरा रोड येथील मानवशक्ती सोसायटीत राहणाऱ्याने माहीने २० डिसेंबर रोजी सायंकाळी घरातील जेवण बनवण्याची तयारी सुरू केली होती. घरातील स्टीलच्या डब्यात तांदूळ ठेवलेले होते. घाईघाईत किंवा अनावधानाने माहीने तांदूळ न निवडता थेट शिजवण्यासाठी घेतले.

पण ज्या डब्यात हे तांदूळ ठेवलं होतं, त्या डब्यात घरच्यांनी तांदळाला कीड लागू नये म्हणून 'कीड प्रतिबंधक गोळी' टाकली होती. अशात माहीने तांदूळ न निवडता भात बनवला. पण या तांदळासोबत डब्यातील विषारी गोळी देखील शिजली गेली. यानंतर माहीने तो विषयुक्त भात खाल्ल्यानंतर काही वेळातच तिची प्रकृती खालावली.

भातातून विषारी गोळी पोटात गेल्याचे लक्षात येताच तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र शरीरात विष पसरल्यामुळे माहीची प्रकृती अधिकच खालावत गेली. अखेर मृत्यूशी झुंज देताना तिची प्राणज्योत मालवली. अवघ्या १७ वर्षांच्या तरुण मुलीचा अशा किरकोळ चुकीमुळे मृत्यू झाल्याने उमाळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group