"या" ठिकाणी घडली विचित्र अपघाताची घटना ; सहा गाड्या एकमेकांना धडकल्या ; नेमकं काय झाले? वाचा
img
Dipali Ghadwaje
नागपूर : राज्यात अपघाताचे सत्र सुरूच आहे , दिवसेंदिवस अपघाताचे प्रमाण वाढत आहे. अशातच नागपूरच्या गोवारी उड्डाणपुलावर एक विचित्र अपघात झाला आहे. उड्डाणपुलावरून जाणारी वाहन एकमेकांना धडकल्याने हा अपघात झाला असल्याचं सांगण्यात येत आहे. यात 6 गाड्या एकमेकांना धडकल्या असल्याने या वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार , आज सकाळी 9 ते 10 च्या दरम्यान हा अपघात झाला. नागपूर शहरातील गोवारी उड्डाणपुलावर आज (दि.03) झालेल्या एका विचित्र अपघातात 6 गाड्या एकमेकांवर धडकल्या आहेत. लोकमत चौककडून झिरो माईलकडे उड्डाणपुलावरून जाणाऱ्या रस्त्यावर वाहन जात असताना अचानक समोरील एका कारने ब्रेक मारला. 

त्यानंतर हा ब्रेक अचानक लागल्याने मागून वेगात येणाऱ्या गाड्या एकमेकांवर मागून धडकल्या. अशा सहा गाड्या धडकल्याने या गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

या सर्व अपघाताचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, या अपघातात केवळ वाहनांचं नुकसान झालं असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नसल्याची माहिती आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group