लग्नावरून परतताना काळाचा घाला, सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू ; कुठे घडली घटना ?
लग्नावरून परतताना काळाचा घाला, सख्ख्या बहीण-भावाचा मृत्यू ; कुठे घडली घटना ?
img
वैष्णवी सांगळे
रस्ते अपघातात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. नागपुरमध्ये भरधाव ट्रकच्या अपघातात दोन चिमुरड्यांचा मृत्यू झालाय. अपघातात मृत्यू झालेले दोन चिमुकले हे सक्खे बहीण भाऊ होते. हा भयंकर अपघात नागपुरच्या सदर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रिझर्व्ह चौकात बुधवारी झाला. 

मिळालेल्या माहितीनुसार, दोघेही काकांसोबत दुचाकीवरून लग्नावरून परतत होते. भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये भावाचा जागीच मृत्यू झाला तर बहिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रुद्र सुनील सिंगलधुपे (११ वर्षे) आणि सिमरन सुनील सिंगलधुपे (१२ वर्षे) अशी मृत बहीण-भावाची नावं आहेत. दोन्ही मुलं हे नातेवाईक शेषनाथसिंग जागेश्वरसिंग यांच्यासोबत दुचाकीवरून जात होते. रिझर्व्ह बँक चौकात ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली.

ट्रकने दुचाकीला धडक दिल्यानंतर रुद्र आणि सिमरन खाली पडले. ट्रकचे चाक रुद्रच्या अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला तर सिमरनचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या अपघातामध्ये जागेश्वरसिंग हे गंभीर जखमी झाले आहेत. ते काठीवरून लग्न आटोपून मकरढोकड्याला गावी जात असताना हा दुर्दैवी अपघात केला. या अपघातामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण होते. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group