मोबाइलचे अति व्यसन बेतलं युवकाच्या जीवावर; रेल्वे रुळ ओलांडताना जागीच मृत्यू
मोबाइलचे अति व्यसन बेतलं युवकाच्या जीवावर; रेल्वे रुळ ओलांडताना जागीच मृत्यू
img
Jayshri Rajesh
नागपूर जिल्ह्यातील रामटेक तालुक्यात एक अपघाताची घटना घडलीआहे. यात मोबाइलचे अति  व्यसन एका युवकाच्या जीवावर बेतलं आहे. कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत असतांना एका 15 वर्षीय मुलाचा अपघात  होऊन त्यात त्याचा जागीच मृत्यू झालाय. रेल्वे रुळ ओलांडत असताना समोरून येणाऱ्या भरधाव रेल्वेने धडक दिल्याने ही मृत्यूची घटना घडली आहे. मालगाडीच्या धडकेत मुलाचा मृत्यू झाल्याची घटना रामटेक तालुक्यातील मनसर येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

 मोबाईल हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग झाला आहे. मात्र या मोबाइलचा अतिजास्त वापर आणि मोबाईलच्या व्यसनाचा परिणाम आपल्या जीवनावर देखील होऊ शकतो. आर्यन केकटे नामक 15 वर्षीय मुलाला या मोबाईलचे व्यसन चांगलेच महागात पडले आहे.

कानात हेडफोन लावून रेल्वे रुळ ओलांडत असतांना या मुलाला दिलेल्या रेल्वेच्या धडकेनंतर मृत्यू झालाय. आर्यन केकटे हा शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे शेतीकडे जाण्यासाठी घरून सायकलवरून निघाला होता.

तो वाटेत लागणाऱ्या रेल्वे रुळाजवळ सायकल उभी करून तो पायी रेल्वे रुळ ओलांडत होता. रेल्वे लाईनच्या पलीकडे त्याचे शेत होते. यावेळी त्याच्या कानात हेडफोन असल्याने त्याला इतर कुठलाही आवाज ऐकायला आला नाही. मोबाईलच्या नादात मागुन रेल्वे गाडी येत असल्याचा अंदाजही त्याला आला नाही. 

 रेल्वे रूळ ओलांडताना त्याला रामटेकहून इतवारीकडे जाणाऱ्या मालगाडीने जबर धडक दिली. रेल्वेच्या धडकेनंतर तो काही अंतरावर रुळांवर ओढला गेला, त्यामुळे त्याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group