रस्त्ये अपघाताच्या घटनांचे प्रमाण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढत आहे , अशातच नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील मॉडेल मिलरोडवर महापालिकेच्या आपली बसने 6 वर्षीय बालिकेला धडक दिल्याने यात त्या बालिकेचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , या घटनेनंतर संतप्त झालेल्या नागरिकांनी बसची तोडफोड केली आहे. चालकाला गणेशपेठ पोलिसांनी घेतलं ताब्यात घेतलं आहे. आराध्या असं मृत मुलीचं ना असून ती पंजाबवरून नातेवाईकांसोबत आजीला भेटायला नागपुरात आली होती आणि आज दुपाही ही दुर्घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी तीन वाजताच्या सुमारास मॉडर्न मिल चौक परिसरात ही दुर्घटना घडली आहे. आराध्या नागदिवे असं सहा वर्षीय चिमुकलीचे नाव असून ती मूळची जालंदर पंजाब येथील आहे. नागपूर येथील मॉडर्न मिल चाळ परिसरातून महानगरपालिकेचे आपली बस पार्डीमार्गे जात असताना अचानक धावत्या बस समोर आल्याने आराध्याला जोरदार धडक बसली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच, आजूबाजूला असलेल्या नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. लोकांचा संताप अनावर झाला. यावेळी काहीही आपली बसच्या मागील काच फोडून फोडली. घटनेची माहिती मिळताच गणेशपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पंचनामा करून पोलिसांनी वाहन चालक सुरेश माणिकराव पारधी याला ताब्यात घेतलं आहे.
आराध्या नागदिवे ही पंजाब येथील असून नातेवाईकाकडे लग्नासाठी आजीकडे आली होती. आजी कचरा फेकण्यासाठी रस्ता ओलांडून गेली. तेव्हा आराध्याही तिच्या मागत धावत सुटली. याचवेळी भरधाव जात असेल्या बस समोर आली, ड्रायव्हरला बसवर नियंत्रण मिळवता आलं नाही आणि बस मुलीच्या अंगावरून गेली.