ट्रक-ट्रव्हल्सच्या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू, 'इतके' जखमी
ट्रक-ट्रव्हल्सच्या भीषण अपघातात ४ जणांचा जागीच मृत्यू, 'इतके' जखमी
img
Dipali Ghadwaje
नागपूर जिल्ह्यातुन एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव येणाऱ्या ट्रव्हल्सने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. या अपघातामध्ये चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली . 

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की ट्रव्हल्सची समोरील बाजूचे मोठं नुकसान झालेय. अपघात झाल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ धाव घेत बचावकार्य केले. त्याशिवाय पोलिसांना याबाबतची माहितीही दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेय.

नेमकं काय घडलं ? 

नागपूर भिवापूररोडवर ट्रक आणि खासगी ट्रव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्सने जोरदार धडक दिली. ट्रकला धडक दिल्यानंतर ट्रव्हल्स बसच्या बाजूला असलेल्या हॉटेलमध्ये घुसली. त्यामुळे हॉटेलचेही मोठे नुकसान झालेय. ट्रव्हल्स आणि ट्रकच्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दहा पेक्षा जास्त जण जखमी आहे. जखमींवर जवळील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत
इतर बातम्या
Join Whatsapp Group